अघोरी सूड - भाग १

  • 14.9k
  • 2
  • 7.5k

लहानपणी आजोबांनी सांगितलेली गोष्ट. आफ्रिका खंडातील बऱ्याच देशात काळ्या जादूचा उपयोग वर्षानुवर्षे चांगल्या आणि वाईट गोष्टींसाठी केला जातो. या लोकांचा त्यांच्या काळ्या जादूवर फार विश्वास असतो. बऱ्याच वेळा ती अंधश्रद्धाच असते पण काही लोकांनां त्यांच्या पिढीजात चालत आलेल्या रूढी परंपरांचा चांगला अभ्यास असतो आणि हे लोक त्यांची अघोरी विद्या पण कशी वापरावी हे जाणून असतात.घाना या देशावर अगोदर ब्रिटिशांचे राज्य होते. त्यावेळी बऱ्याच ठिकाणी या देशातील लोक गोऱ्या अधिकाऱ्यांच्या शेतावर मजूर म्हणून काम करत असत. अशाच एका थॉमस हार्बीन नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या शेतावर माम्बो नावाचा एक स्थानिक युवक काम करत होता. माम्बो कामात चांगला होता पण त्याला एक वाईट सवय