विरह

  • 10k
  • 3.7k

समीरचं आणि स्मिता चं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. त्याचं जरा जास्तच होतं. तिच्यासाठी काय करु आणि काय नको असं त्याला झालेलं. पण त्याला व्यवस्थित नोकरी नसल्याने त्याचा खिसा कायम रिकामा. कडकाच होता बिचारा. पण समीरचा स्वभाव मात्र खुप प्रेमळ .. तिच्या शिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे. स्मिता ला काहीतरी भेटवस्तु द्याव्या.. असं त्याला मनापासुन वाटतं होतं. पण द्यायचं कुठून.? आर्थिक परिस्थिती कमजोर.. शेवटी न राहवुन त्याने तिला रंगीत कागदांची गुलाबाची फ़ुलंच भेटवस्तु दिली..ती खुष होती.. तशीही तिची त्याच्याकडुन फ़ार मोठी अपेक्षा नव्हतीच. तो जे देत होता त्यात ती समाधानीच होती..तसाही तो सामन्यच होता. जेमतेम नोकरी..भविष्यात काही करुन दाखवेल अशी