साधना: तेरा मुस्कुराना गजब हो गया

(11)
  • 9.3k
  • 3.6k

तेरा मुस्कुराना गजब हो गया .....   पन्नासच्या दशकातील अभिनेत्री शीला रामाणी (फंटूश फेम) जेंव्हा पहिला सिंधी सिनेमा ‘आबना’ त  काम (१९५८ ) करित होती त्यात साधना देखील छोट्या भूमिकेत होती. तिने शीलाचा ऑटोग्राफ मागितला. १४-१५ वर्षाच्या मोहक साधनाला ती म्हणाली ‘ आज मी तुला ऑटोग्राफ  देते पण एक दिवस असा येईल ज्या दिवशी  मीच तुझा ऑटोग्राफ घ्यायला येईल!’ शीला रमानीचे शब्द अक्षरश: खरे ठरले. याच सिनेमाच्या सेटवर देव आनंद ने तिला बघितले होते आणि त्याची ही अवस्था ‘ती पाहताच बाला ....’ अशी झाली होती. ’पोर पंध्राची कोर चंद्राची’ अशी तिची रसिली  प्रतिमा बनली होती . साठचे दशक साधनाचे होते.