सावज - 2 - झडप

  • 8.4k
  • 4.4k

गाडीत विशाल ने पुन्हा तिला विचारल काय झालं होत ते. मीनल ने जे घडल ते त्याला सांगितलं. "तिला तुझ्या मध्ये तिची लेक दिसली असेल" म्हणत तो हसला "जाऊदे आता जे झालं ते. काही नाही आता दोन दिवस मस्त एन्जॉय कर" "हां. तेच करायचं  आहे  " मीनल थोड्या वेळाने मीनलने विलास कॉम्प्लेक्स समोर गाडी थांबवली. विशाल तिथे उतरला. त्याच एरिया मध्ये मीनल थोडं पुढं राहते. अगदी चालत गेलं तर पाचच मिनिटावर तीच अपार्टमेंट  होत गेट जवळ येताच संपत वॉचमेनने गेट काढले. व ती खाली अंडर ग्राउंड असलेल्या पार्किंग लॉट मध्ये गेली. संपतने गेट न लावताच आधी पळत जाऊन पार्किंग लॉटची लाईट लावली.