रात्रीची पिझ्झा डिलिव्हरी

  • 12.2k
  • 5k

माझे नाव आयुश. दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी पिझ्झा डिलिव्हरी ची रात्रपाळी करायचो. रात्रपाळी केल्यावर अतिरिक्त भत्ता मिळत असे तसेच ग्राहक थोडी जास्त टीप पण द्यायचे. आणि रात्री १० नंतर च्या डिलिव्हरी साठी डिलिव्हरी साठी कार मिळत असे नाहीतर दिवसाच्या डिलिव्हरी साठी बाईक वापरावी लागायची. या सर्व कारणांमुळे मला रात्रपाळी आवडायची.आमचे पिझ्झा शॉप शहराच्या बाहेरील भागात असल्याने आम्हाला शहराच्या बाहेरून जवळच्याच गावातून पण ऑर्डर्स येत असत. अशीच ती ऑर्डर त्यादिवशी रात्री ११:३० च्या सुमारास आली होती. दोन पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड आणि काही ड्रिंक्स अशी ती ऑर्डर होती. एका बाईने मधुर आवाजात ती ऑर्डर दिली होती मला आठवतेय कारण त्या