स्वप्नस्पर्शी : ५ नेहमीच्या सवयी प्रमाणे पहाटवाऱ्याने राघवांना जाग आली. पण आजची हवा कशी वेगळीच जाणवत होती. स्वच्छ. शहराचा कोलाहल इथे जाणवत नव्हता. प्रदूषणाचा गंध नाही. स्वच्छ, आल्हाददायक हवेत एक असीम शांतता भरुन राहिली होती. निसर्ग अजुन अस्फुट जागृतावस्थेत होता. राघवांना पहाट अंगावर घेत, पडून रहायला फार आवडायचं. ते शांतता