रिमझिम धून - १०

  • 5.5k
  • 3k

'फ्रीझ उघडून जुईने कणिक आणि भाजी बाहेर काढून ठेवली. थोडं सलाड करून तिने टेबलवर ठेवल. पोळी लाटायला सुरुवात केली तेव्हा अर्जुन किचनमध्ये आला होता. तो उगाच तिच्या मागे पुढे करत होता. त्याला स्वयंपाकाचं काहीही येत नाही, हे जुईने ओळखलं. तरीही तो केसात काहीतरी करत जुईच्या मागेच उभा होता.'''अर्जुन पोळी भाजी चालेल ना? मी रात्रीचा राईस करत नाही. तुला पाहिजे तर करते.'' तिने पोळी भाजून घेतली आणि प्लेटमध्ये काढली. अर्जुन अजूनही तिच्या केसात मानेवर काहीतरी करत होता. काहीतरी चेक करावं असं तो तिला बघत होता. जुईला कळेना तो असं का वागतोय. तिने लाटण हातात घेतलं आणि ती मागे वळली. ''काय चेक करतोस,