रिमझिम धून - ८

  • 6.1k
  • 3.3k

'शेवटी डोळे मिटून ती निपचित पडून राहिली. आणि काही क्षणात झोपलीही. झोपेत तिच डोकं अर्जुनच्या खांद्यावर आलं होत. तिची सैल पडलेली मान व्यवस्थित करून त्याने हाताचा आधार देऊन तिला सरळ केले. त्यावेळी तिने घातलेला डीप नेक टॉप किंचितसा खाली सरकला होता. आणि तिच्या मानेवरून थोडं खाली असे काहीतरी लागल्याचे किंवा एखाद्याचा नखांचे निशाण त्याला दिसले. तिला कळू न देता त्याने हळुवार तिच्या खांद्यावरून जॅकेट खाली केले आणि पहिले. मानेवर , खांद्यावर आणि मानेपासून थोडस खालच्या बाजूला असे थोडे फार ओरखडे, आणि लागल्याचे लालसर निशाण होते. जॅकेट पूर्ववत करून त्याने तिचे हात वेगैरे चेक केले. हाताच्या मनगटावर आणि उजव्या पायाच्या करंगळीला