रिमझिम धून - ७

  • 5.7k
  • 3.2k

'साहेब, इमर्जन्सीमध्ये एक फ्लाईट बुकिंग मिळतं आहे, मी तुम्हाला फोन करणार होतो, पण मोबाइल ची बॅटरी डाऊन झाली. काय करू? दोन तिकीट मागवू?'' दाराबाहेर बाहेर मागेच उभा होता. तो  अर्धवट भिजलेल्या अवस्थेत दिसत होता. आत येऊन त्याने अर्जुनला सांगितले ''केव्हाच फ्लाईट आहे?'' अर्जुन म्हणाला. ''आज पहाटे ४ चे, तुमच्या ओळखीवर या मॅडमला एक सीट नक्कीच मिळून जाईल. कालच त्यांचे कागदपत्र बनवून झाले आहेत. त्यानंतर केव्हा सोय होईल माहित नाही. आणि इथली पूरस्थिती पाहता तुम्ही मुंबईला परतणे योग्य आहे.'' मंगेश जुई आणि अर्जुनकडे बघत म्हणाला. ''दोन तिकिटे बुक कर, डिटेल्स मेसेज करतो. तिकिट्स एअरपोर्ट आल्यावर मला दे. आणि इथलं बिल सेटल कर.'' अर्जुनने