बबन्या

  • 8.1k
  • 3k

                 ..... बबन्या ..... सकाळी सकाळी एस टी स्टॅंडवर बबन्या येरझारा घालीत आणि उठा बशा काढीत एस टी कव्हा येतीय म्हणून घडी घडी मान वर करून पहात व्हता.. जाणारा येणारा जाता येता ... “काय बबनराव..आज लई येरवाळी हाजरी लावलीय..?नंबर लागणार हाये वाटतं आज ?” “ए.. बाळ्या..! भाड्या जा की गपगुमान आपल्या वाटानं.. कशापायी डोकं उठीवतोय..?” “आरं.. बबन्या म्या तुला बबनराव म्हणलं आन् त्वा तं लगेच श्या द्याया लागलाय.. अशानं नंबर लागन व्हय रं तुझा...” “मंग काय आरती ववाळू का काय?माझा नंबर लागंन न्हाई तर न्हाई लागंन.. त्वा मला पैशे देतोस काय ? “