होल्ड अप - प्रकरण 17

  • 5.4k
  • 3.2k

प्रकरण १७सौम्या आणि पाणिनी तिथून बाहेर पडल्यावर पाणिनी आपल्या गाडीत ड्रायव्हिंग सीट वर बसताच सौम्या ने विचारलं, “ आता पुढे काय सर? ”“ आता आपण काही काळासाठी चक्क गायब व्हायचं सौम्या. पोलीस आपल्याला शोधायचा प्रयत्न करतील, आपल्या नेहेमीच्या हॉटेल मध्ये, ऑफिसात, कोर्टात वगैरे.”“ पण सर, आपण नाहीना असं करू शकत. सोमवारी कोर्टात जावच लागेल आपल्याला.केस आहे.” सौम्या म्हणाली.“ सोमवार यायला वेळ आहे, तो पर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलं असेल.” पाणिनी म्हणाला.“ या शहरातले प्रसिद्ध फौजदारी वकील पाणिनी पटवर्धन यांनी मला जो कायदा शिकवलाय, त्या नुसार पलायन करणे हा गुन्हा केल्याचा पुरावा ठरतो.” सौम्या म्हणाली.“ बरोबर शिकली आहेस सौम्या. परीक्षेत