होल्ड अप - प्रकरण 16

  • 5.5k
  • 3.3k

प्रकरण १६पाणिनी ऑफिसला आला तेव्हा दार बंद होत आणि दाराला चिट्ठी होती,‘ मी आणि मृद्गंधा बाहेर गेलोय.काही लागलं तर माझ्या घरी फोन करा.’पाणिनी ने चिट्ठी वाचून फाडून कचरा पेटीत टाकली.दार उघडून आत आला तेवढ्यात फोन खणखणला.“ सर मी अडकल्ये.” सौम्या चा तार स्वरातला आवाज आला.“ नेमकं काय झालंय सौम्या?”“ फोन वर सांगणे योग्य नाही सर.”“ तू आहेस कुठे अत्ता?”“ ज्या घरातून ठसे घ्यायचे होते तुम्हाला, तिथे.”काय घडलं असावं ते पाणिनी च्या पटकन लक्षात आलं.त्याने मृद्गंधा ने जिथे ठसे घेण्याची उपकरणं ठेवली होती तिथे पाहिलं.तिथे काही नव्हतं त्या जागेवर.“ मृद्गंधा तुझ्या बरोबर आहे, सौम्या?” पाणिनी ने विचारलं.“ नाही तिच्या मागावर तो