अव्यक्त प्रेमाची कथा. भाग ४

  • 6.1k
  • 3.8k

अव्यक्त प्रेमाची कथा. पात्र रचना संदीप आपल्या कथेचा नायक. सुशीलाबाई संदीपची आई. केशवराव संदीपचे वडील. अभय संदीपचा मोठा भाऊ. अश्विनी अभयची बायको. रामलिंगम संदीपचे सहकारी. रमेशकुमार संदीपचे सहकारी. प्रसाद संदीपचे सहकारी. विश्वनाथन साहेब कंपनीचे उपाध्यक्ष शलाका आपल्या कथेची नायिका भाग ४ भाग ३ वरून पुढे वाचा ...... लाऊड स्पीकर वर करफ्यू ची घोषणा करत एक पोलिस व्हॅन त्या रस्त्यावर आली आणि त्यांना संदीप आणि शलाका दिसले, त्यांनी ताबडतोब अॅम्ब्युलन्स बोलावली. दोघा जणांना उचलून घेऊन गेले आणि हॉस्पिटल मधे अॅडमिट केलं. हॉस्पिटल मधे इतकी गर्दी होती, की दोघांना वेग वेगळ्या हॉस्पिटल मधे अॅडमिट करावं लागलं. त्या गुंडांनी संदीपला लोखंडी कांबीने अमानुष