रिमझिम धून - ५

  • 5.9k
  • 3.5k

''नाही, नको, त्याची काही गरज नाही.'' ती म्हणाली. ''घरी कोणी नाही का?'' हळूहळू चालत जाऊन त्याने आपली बॅग बाहेर काढली. अर्जुन आपली बॅग उघडून काहीतरी शोधत जुईला विचारत होता. ''आहेत सगळे, पण फोन नको, डायरेक्ट जाऊन भेटेन.'' म्हणत उठून तिने ग्लासमध्ये पाणी घेतले आणि ती पिऊ लागली. ''हा घ्या मोबाइल, एक्सट्रा आहे. सेफ्टीसाठी असूदेत. माझा नंबर सेव्ह आहे, गरज लागली तर केव्हाही कॉल करू शकता.'' आपल्या बॅगमधील अतिरिक्त असलेला एक सेलफोन तिच्याकडे देत तो म्हणाला. ''नको, खरचं नको.'' तिने तो घेतला नाही, त्याने तिचा हात वरती करून त्यावर तो मोबाइल आणि चार्जर त्यावर ठेवला. आणि तो पुन्हा येऊन बेडवर बसला.