रिमझिम धून - ३

  • 6.8k
  • 1
  • 4.4k

''ये मॅडम हमारे साथ मैं ही हैं, उनका बॅग ले लो.'' त्या जखमी व्यक्तीने त्या मुलीकडे बोट दाखवत सांगितले. तेव्हा तिच्या लक्षात आले की, या सगळ्या गडबडीत तिची ट्रेन निघून गेली आहे.  सुटलेली ट्रेन बघून ती मटकन तीथेच श खाली बसली होती. ट्रेन तर निघून गेली होती. मागे काही अंतरावर बेशुद्ध होवून पडलेले ते चार गुंड केव्हाही शुद्धीवर आले असते. या विचाराने तिला अजून धडकी भरली.  तिला मागे बघण्याचेही धाडस होईना. ती उठून त्या जखमी तरुणाच्या मागे चालू लागली. 'हॉटेल कोकोनला आल्यावर ती मुलगी थोडी रिलॅक्स झाली. ते दोन सफेद कपड्यातील इसम त्या जखमी तरुणाला तिथे सोडून गेले. आणि पाच