भेटली तू पुन्हा... - भाग 4

  • 11.6k
  • 8.3k

अन्वी लाजून तिथून पळून गेली, तर आदी तिच्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत समाधानाने हसत होता. हसतच तो मागे फिरला तर समोर गोखले सर उभे होते. हे पाहून आदित्य दचकला व दोन पावले मागे गेला. हे पाहून तर गोखले सरांना जास्तच जोर आला ते रागाने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत दोन पावले पुढे गेले. "ओ! सॉरी." अस म्हणून आदी तिथून निघत होता. "कोण आहेस तू?" गोखले सर रागाने व तिरस्काराने बोलले. " मी आदित्य, तुम्ही मला ओळखता का?" आदीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत गोखले सर आपलाच प्रश्न विचारतात "काय करतोस तू?" "मी CA आहे, तुमचे काही काम आहे का माझ्याकडे" आदि चेहऱ्यावर स्मित