" मुलांनो हळूहळू उतरा. आणि एकमेकांचा हात धरून दोघे दोघे रांगेत उभे राहा" अन्वी व मस्के मॅडम मुलांना बस मधून खाली उतरवत त्यांना इन्स्ट्रक्शन देत होत्या. म्हेत्रे व सावंत मॅडम पुढे मुलांना घेऊन जात होत्या. गोखले सर उगीचच अन्वी च्या मागे पुढे करत होते. "गोखले सर येताय ना?" पाटील सर येऊन आवाज देऊन पुढे गेले. "हो आलोच! तुम्ही चला पुढे मी आलोच" अस म्हणून त्यांनी पुढे जाणे टाळले. मागून मोरे शिपाई येत होता. "काय मोरे मागे कोणी राहील नाही ना?" गोखले सर मुद्दाम कारण काढून मागे थांबत होते. " सगळे गेले सर,