मॅनेजरशीप - भाग १३

  • 4.8k
  • 2.6k

मॅनेजरशीप  भाग  १३   भाग १२ वरून पुढे वाचा.....   “म्हणूनच एवढे रुक्ष झाला आहात. कायम आपला गंभीर चेहरा. एखादी गोष्ट आवडली की नाही हे ही समोरच्याला कळत नाही.” आणि मग चित्रात जसं दाखवतात की परमेश्वर भक्ताला हात समोर करून भक्ताला वर देतात त्या प्रमाणे पोज घेऊन म्हणाली की “मॅनेजर साहेब, हसत रहा, जीवन सुखाचं होईल.” आणि पुन्हा हसायला लागली. अर्थात मधुकर ला पण हसू आवरलं नाही. थोड्या वेळाने मेघना भानावर आली आणि म्हणाली “अरे आपण हसत काय बसलो आहोत, मी ज्या कामासाठी आली, ते राहूनच गेलं. तुमचं जेवण व्हायचं आहे. चला तुमचं पान घेते.” आणि ती किचन मध्ये ताट