मॅनेजरशीप - भाग ११

  • 5.1k
  • 2.7k

मॅनेजरशीप भाग ११ भाग १०  वरून पुढे वाचा.....   “ते इथे एकटेच राहतात. त्यांची बहीण इंदूरला असते. तिला कळवलं आहे ते लोक उद्या पर्यन्त पोचतील.” – जयंत. ‘ठीक आहे, ICU मध्ये असल्याने तशी कोणी थांबण्याची जरूर नाहीये. तेंव्हा तुम्ही चला आता. काही वाटलं तर जयंतराव तुम्हाला कळवूच.” डॉक्टरांनी सांगितलं.  सगळे घरी जायला निघाले पण मागे सचिन थांबला. तो तरुण होता आणि धाव पळ करू शकत होता म्हणून तोच थांबला. दुसऱ्या दिवशी मधुकरची बहीण अनिता आणि तिचा नवरा राजेश आले. त्यावेळेला जयंतची मेहुणी, डॉक्टर मेघना तिथे राऊंड वर होती. “डॉक्टर, आता कशी आहे मधुकरची तब्येत ? आम्ही बघू शकतो का ?”