मॅनेजरशीप - भाग १०

  • 5.3k
  • 2.8k

  मॅनेजरशीप भाग  १० भाग ९  वरून पुढे वाचा.....   “ठीक तर मग. अजून एक गोष्ट आपण विक्रमसिंग ला काढून टाकलं आहे त्यांची पण जागा भरणं आवश्यक झालं आहे. मी आधीच इंटरव्ह्यु घेऊन दोन नाव फिक्स केलीच आहेत हे तुम्हाला माहितीच आहे. त्यांच्या पगाराचं पण बघाव लागणार आहे.” – मधुकर. “हो साहेब, आपण उद्याच मीटिंग मध्ये सर्व फायनल करून टाकू.” स्वामी म्हणाला आणि मग  मीटिंग संपली. नंतर संध्याकाळ पर्यन्त मधुकर जे काही बदल त्याला अपेक्षित होते त्या बद्दल टिपणं काढत बसला होता. डोक्यात खूप विचार होते. खूप काही सुधारणा करायच्या मनात होतं. पण उद्या स्वामी आणि फिरके काय सांगतात त्यावर