मॅनेजरशीप भाग ६ भाग ५ वरुन पुढे वाचा ........ “हॅलो धवन, सुशील बोल रहा हूं. इथे मोठाच घोटाळा झाला आहे.” - सुशील बाबू. “काय झालं ? इतकं अप्सेट व्हायला काय झालं ?” – धवननी विचारलं. सुशील बाबूंनी मग दिवसभरात काय काय घडलं त्याचा पाढा वाचला. ऐकल्यावर धवन विचारात पडला. “सुशील मुझे जरा सोचने दो. I will call you back.” – धवन “जलदी सोचो भाई. लक्ष्मी मेटल बंद व्हायची वेळ आली आहे.” – सुशील बाबू. “मी फोन करतो.” – धवन धवन विचारात पडला. स्क्रॅप मधून tungsten आणि molubdenum परत मिळवणं हे एक चांगलच फायदेशीर काम होतं. आणि windmill hub चे