होल्ड अप - प्रकरण 10

  • 6.2k
  • 3.6k

प्रकरण १०दुसऱ्या दिवशी सव्वा अकरा वाजता पाणिनी ऑफिसातल्या त्याच्या केबिन मधे असतांना त्याचा फोन वाजला.सौम्या फोन वर होती. “ सॉरी सर तुम्ही तुमच्या सवयी प्रमाणे कोर्टाचे अद्ययावत निकाल वाचत असाल पण त्रास देत्ये कारण बाहेर अशी व्यक्ती आल्ये की तुम्ही तिच्याशी बोलायला हवं अस मला वाटतं.”कनक , सौम्या, आणि पाणिनी खास मित्र होते. वर्ग मित्र.एकमेकांना काहीही बोलू शकत होते,एकमेकांसाठी कधीही काहीहीकरू शकत होते. कनक गुप्त हेर झाला,पाणिनी च्याच मजल्यावर त्याने ऑफिस थाटले. इन्स्पे.तारकर हा त्यांच्याच बरोबरचा खास मित्र.पण तो पोलीस झाला. अनेकदा तो आणि पाणिनी एकमेकांच्या विरुध्द उभे ठाकले पण मैत्री आणि व्यवसाय ,यात त्यांनी कधी गल्लत केली नाही.मैत्रीत कधीच