होल्ड अप - प्रकरण 7

  • 6.7k
  • 4k

होल्ड अपप्रकरण ७“ तुझ्या सहवासात दिवसभराचा एकटे पणा निघून जाईल.” पाणिनी म्हणाला.“ तुम्ही मला माझं नाव सांगून बोलावून घेतलंत? ” –मिष्टी.“ हं ” पाणिनी म्हणाला.“ कसं काय?” –मिष्टी“ मी तुझ्या बद्दल ऐकलं होतं. तू व्यस्त होतीस कामात?”“ मी...मी इथे नव्हते. घरी होते मी.”पाणिनी काहीच बोलला नाही.“ एकटीच...” तिने वाक्य पूर्ण केलं आणि पाणिनी कडे पाहिलं.पाणिनी च्या चेहेऱ्यावर काहीच भाव उमटले नाहीत तेव्हा ताण हलका करण्यासाठी ती म्हणाली,“ मला आश्चर्य वाटलं तुम्ही मला कस काय ओळखत होता ! ”“ माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीने तुझ्या बद्दल सांगितलं.”“ विशेष आहे हे. कारण मला इथे फार दिवस झालेले नाहीत.” –मिष्टी“ मला त्या व्यक्तीने तसंच