नमस्कार मंडळी आजच्या या ब्लॉगला खरंतर कशी आणि कुठून सुरुवात करू सुचत नाहीये , कारण ज्या नात्याविषयी आज मी बोलणार आहे त्याबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच आहे… या नात्याची सुरुवात नक्की कधी पासून झाली हे देखील मला ठीकस आठवत नाही , पण जितक आठवेल आणि जसं जमेल तसं सांगण्याचा मी प्रयत्न करतो. काळ साधारण 1990-91 दशकातला , माझं वय साधारण सात ते आठ वर्ष , शाळेत जायला नुकतीच सुरुवात झाली होती, कदाचित पहिली किंवा दुसरीत असेल . माझी शाळा म्हणजे सर्वांच्या परिचयाची अर्थात बालमोहन विद्यामंदिर दादर शिवाजी पार्क , तिथून थोडसं पुढे गेलो की लगेच शिवसेना भवन आणि त्याच रस्त्याच्या