मागणी

  • 7.6k
  • 1
  • 2.9k

मागणी हेमंत पेशाने जरी इंजिनियर असला तरी एक हरहुन्नरी कलाकार होता.आपल्या नोकरीतल्या कामात जेव्हढा तो निष्णात होता तेवढाच तो कलासक्तही होता.संगीत,साहित्य, चित्रकला, नाट्यकला अशा चौफेर क्षेत्रात त्याची मुशाफिरी होती. पुण्यातल्या सांस्कृतिक क्षेत्रातला अष्टपैलू उगवता तारा म्हणून त्या त्या क्षेत्रातले जाणकार लोक हेमंतकडे पहायचे.कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी आपली सरकारी नोकरी इमाने इतबारे करता करता आपल्या सगळ्या छंदाची जोपासनाही हेमंत करत होता...अगदी मजेत होता हेमंत! दैवाला मात्र हे सुख फार दिवस पहावले नाही....सरकारी नियमाप्रमाणे हेमंतची बदलीची ऑर्डर निघाली, तीसुध्दा मुंबई महानगरात! पुण्याचे संथ सुखी आयुष्य सोडून अखंड धावणाऱ्या मुंबईत आपला निभाव कसा काय लागणार याची चिंता त्याला होती. नोकरी करणे ही गरज होती,