मृण्मयीची डायरी - भाग ८

  • 5.2k
  • 1
  • 2.4k

मृण्मयीची डायरी भाग ८मागील भागावरून पुढे…वैजू साधारण महिनाभरानी परत नागपूरला येते. कारण अमीता मॅडमनी येत्या शनिवारी साधारण दोन वाजेपर्यंत क्लिनीकमध्ये सारंग आणि वैजूला बोलावलं असतं.वैजू सकाळी बसमधून उतरल्या उतरल्या सारंगला म्हणते. "सारंग आपण परवा आधी अमीता मॅडमच्या क्लिनीकला जाऊ नंतर प्राजूला भेटू असं मी म्हटलं होतं तुला.तसं सांगीतलं कातू प्राजूला ?"" हो.तिलाही हाफ डे आहे तर जमेल म्हणाली.""घरी या गोष्टी बोलणं म्हणजे आ बैल मुझे मार असं करण्यासारखं होईल. अमीता मॅमशी बोलणं कधीपर्यंत आटपेल त्यावर प्राजूला कधी भेटायचं ठरवू." वैजू म्हणाली." हो चालेल.मी तसंच सांगीतलं आहे प्राजूला."बोलता बोलता दोघं घरापाशी आले.वैजू बॅग घेऊन घरात शिरली.आईची चांगली,वाईट या मधील कोणतीच प्रतिक्रिया