मृण्मयीची डायरी - भाग ७

  • 5.2k
  • 2.6k

मृण्मयीची डायरी भाग ७वैजू आणि सारंग घरी पोचतात तेव्हा सारंग म्हणाल्या प्रमाणे आई बाबा समोरच्या हाॅलमध्ये या दोघांची वाट बघत असतात.टिव्ही नावालाच चालू असतो.वैजू आणि सारंग एकमेकांकडे बघून हसतात.सारंग मान आणि डोळे मिचकाऊन वैजूला म्हणतो "बघ मी म्हटलं होतं तसंच झालं की नाही?" दोघंही हसत घरात शिरतात.आईबाबांना वाटतं की हे दोघं काहीतरी सांगतील.कुठे गेले होते इतक्या वेळ.पण दोघांपैकी कोणीच बोललं नाही.पुढील प्रश्नाची सरबत्ती टाळण्यासाठी वैजू आत जाऊ लागली तेवढ्यात जतीनचा तिच्या नव-याचा फोन येतो.तिला मनातून हायसं वाटतं.ती आत जाते.पायातील काढलेल्या चपला सारंग पुन्हा पायात अडकवतो आणि " आई मी येतो थोड्याच वेळात." असं म्हणत घराबाहेर पडतो आणि तो ऊदयकडे पळतो.वैजू