मृण्मयीची डायरी भाग ५वामागील भागावरून पुढे…वैजू आत आली तर तिला सारंग रडताना दिसला.त्याला रडताना बघून वैजूच्या डोळ्यातून पुन्हा पाणी वाहू लागले.सारंग दोन्ही हातांनी डोकं पकडून जमीनीकडे बघत मुसमुसत होता.वैजूने सारंगजवळ जाउन त्याच्या पाठीवरून हात फिरवला.सारंगने वैजूकडे वर बघितलं तसं वैजू त्याला म्हणाली,"सारंग मला वाटतं आपण त्या काऊन्सलरला भेटाव.."" आता काय उपयोग भेटून?""नेमकं तिला काय झालं होतं हे तरी कळेल. तिला आई घेऊन गेली होती पण नंतर आपण कुठे काही विचारलं आईला? ऊलट मृण्मयीला काऊंन्सलरची गरज पडली यावरच आपण हसलो. खरच हसण्यासारखं होतं का काही? सारंग आपण असताना तिला काऊंन्सलरची गरज पडायला नको होती.""हो...खरय तुझं म्हणणं. आपण तिच्या प्रश्नांना किती सहजपणे