मृण्मयीची डायरी - भाग ४

  • 5.4k
  • 3k

मृण्मयीची डायरी भाग ४था..मागील भागावरून पुढे….किती तरी वेळ वैजू डायरीकडे सुन्न नजरेनी बघत बसली होती. तिला वाटू लागलं एका मुग्ध निरागस मनाच्या जीवाला आपण खूप मोठ्ठी शिक्षा दिली.अशी शिक्षा देण्याचा आपल्याला काय अधिकार होता?आपल्या स्वप्नांच्या कळ्या वेचण्यासाठी आपण धडपड केली नं! तिची स्वप्नं तर खूपच छोटी होती.ती फुलवण्याचा तिला आपल्यासारखाच अधिकार होता. मी, आई, बाबा, सारंग सगळ्यांची जबाबदारी होती तिच्या स्वप्नांना ऊमलविण्यासाठी हवी ती मदत करायची. मदत सोडा आपण तिची स्वप्नंसुद्धा समजून घेतली नाही.तिची स्वप्नं या जगातील स्वप्नांपेक्षा वेगळी होती. निरागस होती. सच्ची होती. तिची स्वप्नं आपल्याला पेलवली नसती कदाचित.आपण नेहमीच जगाच्या वेगवान शर्यतीत दौडत होतो. या जगात निरागसतेला किंमत