आभाळपाखरू दार उघडलं की गार वाऱ्याच्या सुखद लहरींनी त्यांच्या साम्राज्यात स्वागत केलं. त्या गोड शिरशिरीनी संपूर्ण निसर्ग थरथरत होता. कुठल्यातरी आनंदाचा उपभोग घेत घेत रमत गमत चालावे तसा पाऊस हलक्या तुषारांनी भुरभुरत होता. झाडांच्या पानापानातून पावसाचे थेंब चमकत होते. मधूनच एकमेकांना मिळून घरंगळून जात होते. आभाळात एक छोटसं पाखरू घिरट्या