ऋतू बदलत जाती....२३. तसा अनिकेत हे पुढे सरसावला, त्याने तिच्या हाताला पकडले. भरलेल्या डोळ्यांनी त्याने मानेनेच तिला नाही सांगितले.. त्याच्या डोळ्यातले अश्रु बघून शांभवी शांत झाली, हळूच ती खाली जमिनीवर उतरली... "अनि... "त्याला बघून तिचेही डोळे भरून आले होते... तिने हाताने त्याच्या चेहऱ्यावर गोंजारले .. त्याने थोडे स्मित झळकवत मानेने होकार दिला... आणि दुसर्याच क्षणी ती त्याच्या मिठीत गेली. ******* आता पुढे.... महेशीने खाली मान घातली आणि ती आत निघून गेली. "अनिकेतssss.. शांभवी sss ! " क्रिश ने दोघांना आवाज देऊन भानावर आणलं. शांभवीची नजर परत त्या दोघांवर गेली.. दोघं रक्ताने लटपट तिथेच जमिनीवर अंगाची वळकुटी करून बसले होते...शांभवीची नजर