एक कर्ज असेही….

  • 9k
  • 1
  • 3k

नमस्कार मंडळी, आज सकाळी नऊच्या सुमारास ऑफिसला आलो. जास्त ट्रॅफिक नसल्याने ,अर्धा तास आधीच , बायोमेट्रिक्स देऊन माझी हजेरी मी ऑफिसात लावली होती. ऑफिशियल काम चालू व्हायला अजून 30 मिनिट अवकाश होता , म्हणून पटकन एक कॉफीचा मग  पॅन्ट्रीमधून आणून मी माझ लॅपटॉपरूपी दुकान उघडल….. आज ऑफिसचे काम चालू होण्याआधी जरा पर्सनल ईमेलवर नजर टाकूया , आणि किती पत्र [e-mails] आपल्या उत्तराची वाट बघतायत हे पाण्यासाठी माझा पर्सनल ईमेल मी ओपन केला. एक ई मेल चा मजकूर वाचायला घेतला आणि वाचता वाचता एक सुखद आश्चर्याचा धक्का मला बसला. तो मजकूर ….[थोडक्यात] मिस्टर  , आमच्या बँकेच्या रेकॉर्डप्रमाणे तुम्ही घेतलेले गृहकर्ज आणि