काहे दिया परदेस - 1

  • 10k
  • 1
  • 3.7k

भाग - १  अचानक साक्षी खडबडून जागी झाली. पहाटेचे ६ वाजले होते. साक्षीची आज ऑफिस मध्ये खूप महत्वाची मीटिंग होती. बाहेरून साहेब येणार होते, आजचा दिवस तिच्यासाठी खूप महत्वाचा होता. परंतु साक्षीला कालच्या जागरणामुळे पुन्हा झोपावेसे वाटत होते. ती स्वतःशी पुटपुटली आणि म्हणाली, "फक्त १० मिनिटे झोपते", तितक्यात साक्षी ची आई आली. (वंदना जोशी म्हणजे साक्षीची आई.. खूप साधी, सरळ आणि उच्च विचारांची. नवरा मिलटरी सर्विस मध्ये असल्याकारणाने साक्षीचे एकटीने पालनपोषण केले.आपला नवरा मिलिटरी मध्ये होता म्हणून त्यांच्याबद्दल खूप अभिमान.) वंदना - अगं, साक्षी उठ लवकर, तुला जायचं नाही आहे का ऑफिसला??? बघ वाजले किती. आज ऑफिसमध्ये महत्वाचा दिवस आहे