कॉफी कॅफे आणि फीलिंग्स

  • 5.7k
  • 1.9k

आठवणी फक्त मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त नसतात तर काही ठिकाण हि आठवणींना उजाळा देत भावना समजून घेतात अश्याच एका ठिकाणाची गोष्ट माझ्या नव्या कथेमध्ये "कॉफी कॅफे आणि फीलिंग्स "   सकाळची वेळ रेडिओ वर "जब कोई बात बिगड जाये "गीत चालू होते एवढ्यात दरवाजाची बेल वाजली देशमुख आजोबानी रेडिओ बंद केला आणि दरवाजा उघडला आणि समोर  "नमस्कार आजोबा"  "कोण तू आणि मला आजोबा का म्हणतोस "? "माफ करा तसा आपला परिचय नाही पण मिस्टर देशमुख म्हण्यापॆक्षा आपुलकीने आजोबा म्हणे मला साजेशे वाटले"  "पण मी तुला नाही ओळखत " "नाही आपली ओळख नाही पण मी तुमच्या कॅफे मध्ये दररोज येतो " "बरं