आरोपी - प्रकरण १७

  • 6.4k
  • 3.5k

न्यायाधीश मुळगावकरांनी आपला अंगावरचा झगा जरासा सारखा वरून घेतला. “ मिस्टर खांडेकर मला असं समजलं की मागच्या वेळेला कोर्ट तर तहकूब केल्यापासून बऱ्याच काही नाट्यमय घडामोडी घडल्या क्षिती आलूरकर च्या प्रकरणात?” “अगदी बरोबर आहे युवर ऑनर. त्याच अनुषंगाने मला इन्स्पेक्टर तारकर यांना साक्षीसाठी पुन्हा पिंजऱ्यात बोलवायचे आहे” खांडेकर म्हणाले. इन्स्पे.तारकर साक्षीदाराच्या पिंजऱ्यात पुन्हा उभा राहिला. त्याला सरकारी वकिलांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्या प्रश्नांच्या उत्तरात त्यांने सांगितलं की त्यांन आणि त्याच्या हाताखालच्या पोलिसांने मधुरा महाजन च्या घरी अचानक धाड टाकली. त्या वेळेला त्याला कार्पेट च्या खालच्या चोर कप्प्यात मोठी रोख रक्कम ठेवलेली दिसली. ते जेव्हा आत शिरले त्यावेळेला पाणिनी पटवर्धन