आरोपी - प्रकरण १६

  • 6.7k
  • 3.3k

प्रकरण १६ कोर्टाचं कामकाज संपल्यानंतर पाणिनी पटवर्धन कनक कडे वळला, “कनक तुझ्या लक्षात आले का?” तो एकदम एक्साईट होऊन म्हणाला. “काय लक्षात आलय का?” “अरे सगळंच चित्र स्पष्ट झालंय. येतंय का लक्षात? तो साहिर सामंत खरं बोलत होता ! संपूर्ण सत्य नाही पण खूपसं खरं बोलत होता. आता माझ्या लक्षात आले आपल्याला नक्की काय करायचे ते कोणाशी आपली गाठ आहे ते.”” “काय लक्षात आलय पण तुझ्या पाणिनी?” “अरे तो वॉटर कुलर हलवला गेला होता.” “हलवला गेला होता म्हणजे? आणि त्या वॉटर कुलर च काय?” “अरे ,मधुरा महाजन च्या बेडरुममध्ये वॉटर कुलर होता.. बहुदा ती शुद्ध केलेले पाणी फक्त पीत असावी