एक प्रेम कहाणी अशी पण

  • 6.5k
  • 1
  • 2.1k

ओह ! विराज किती वर्षांनी तुला बघितले. तुला एवढ्या वर्षांनी बघून पण माझ्या हृदयाचे ठोके वाढले. अजून पण किती सुंदर दिसतोयस रे! असे वाटते तुलाच बघत राहावे.   "मावशी, तिकडे बसून घ्या बरे, कार्यक्रम सुरु होत आहे." तुला बघण्याच्या नादात विसरले होते की मी मध्ये उभे होते. सीटवर बसले आणी माझ्या शेजारी बसलेली मीना हळूच कानाजवळ येऊन म्हणाली, "श्रद्धे, तो म्हातारा आवडलाय का? सेटिंग करून देऊ का?"   तूच सांग तीला काय सांगावे, तरी कोपरा मारून तीला सांगितले, "वेडी झाली आहेस का, गप्प बस काळतोंडे." विराज, कार्यक्रम सुरु झाला आणी आमच्या आनंदगृह वृद्धाश्रमचे एक ट्रस्टी मुकुल शेटने तुझे स्वागत पुष्पगुच्छ