स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 7

  • 9.4k
  • 6.2k

संध्याकाळचे 6 वाजले होते..... तरीही मिष्टी अजून अविनाशच्या केबिन मधून बाहेर नव्हती आली..... विराजच कितीही केलं तरी तिच्या डेस्ककडे लक्ष जातच होत.....ऑफिस टायमिंग संपल होत.....विराज उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबायचा..... थोड्याचवेळात मिष्टी परत तिच्या डेस्कवर परत आली आणि तिने तिचा pc ऑन केला.... ऑफिस मध्ये जवळजवळ सगळेच निघून गेले होते.... जे राहिले होते ते पण निघायच्या तयारीत होते.... तरीही अजून ती कामातच होती.... अविनाश देखील निघाला होता....अविनाशने जाता जाता मिष्टीला सांगून गेला....7 वाजायला आले होते तरीही ती अजून कामच करत होती....."पहिल्याच दिवशी एवढ्यावेळ थांबून कोण काम करत??" विराज मिष्टीकडे बघत म्हणाला..... विराजने थोड वैतागतच घडयाळ पाहिलं 7 वाजून 5 मिनिटे झाली होती.....