शिंपल्याचे शोपीस नको जीव अडकला मोत्यात.. - 2

  • 7.8k
  • 4.1k

एक ९-१० वर्षाची मुलगी तिच्या आई बाबांना थांबवत होती..पण ते काही थांबत न्हवते.....ती लहान मुलगी खूप रडून ओरडून त्यांना थांबवायचा प्रयत्न करत होती पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता.....ती लहान मुलगी "मम्मा प्लीज नको ना सोडून जाऊ..... आय प्रॉमिस मी कधीच मनू दि ला धक्का देणारं नाही...तिच्याशी भांडणार पण नाही....बाबा तू तरी नको जाऊं ना..."ती मुलगी खूप रडत आणि जितकं ओरडून संगता येईल तितकं ओरडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होती...पण तिचे आई बाबा काही थांबलेच नाही..त्यांनी त्यांच्या जवळ असणारी ११-१२ वर्षाच्या मुलीला गाडीत ठेवलं आणि आपल सामान घेत निघून गेले....ती मुलगी किती वेळ त्या गाडीच्या पाठी धावत होती...पण ती गाडी