माझं काय चुकलं??

  • 10k
  • 3.2k

नमस्कार मंडळी. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तीळगुळाचे दोन लाडू हातावर ठेवून शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणारा बंटी सायंकाळी येऊन जातो न जातो तोच त्याच्यापाठोपाठ त्याचा मोठा भाऊ बबली दुसरे लाडू घेऊन तीच शुभेच्छा देण्यासाठी येऊन गेला.  मकर संक्रांतीच औचित्य साधून जवळपास सोसायटीतले सर्वजण एकमेकांना भेटून अशा शुभेच्छा देण्यात मग्न होते. मी ही अगदी त्याच उत्साहाने जे लोक भेटतील त्यांना मनापासून शुभेच्छा देऊन हा शेजारधर्म असाच जपून ठेवू या, अशी अपेक्षा वजा शुभेच्छा सर्वानाच देत होतो. दिवस अगदी मजेत गेला.तिळाचे लाडू खाऊन तोंड इतके गोड झाले होते की पुढचे दोन दिवस बिन साखरेचा चहा जरी घेतला असता तरी तो मला कडू