शिंपल्याचे शोपीस नको जीव अडकला मोत्यात.. - 1

  • 10.9k
  • 2
  • 5k

"नको प्रेम करू इतकं की...आपण दूर झालो की तुलाच सांभाळणं अवघड होईल." राहुल म्हणाला. "वेडा आहे का तू....मला माहित आहे तू मला सोडून जाऊच शकत नाहीस...कारण तुझ माझ्यावर खूप प्रेम आहे..त्यामुळे असल फालतू बोलणं बंद कर.......नाहीतर एक कानाखाली देईल......." त्रिशा हसत म्हणाली....त्यावर तो पण किंचित हसला..त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला...ती समोर पाहत होती......तो मनातच तिच्याकडे बघत म्हणाला.. "सोडून तर जावच लागेल , पण तुला कसं सांगू हे कळत नाही आहे...." राहुल मनात म्हणाला....पण मनात बोलताना सुद्धा त्याला प्रचंड वेदना होत होत्या... त्रिशा सध्या 11 वी ला होती....आणि राहुल मेडिकल च्या सेकंड year ला होता....दोघांचं एकमेकांवर अगदी जीवापाड प्रेम होत,अल्लड प्रेम.....