काय नाते आपले? - 2

  • 10.7k
  • 6.9k

सर्वांचे चेहरे पांढरे पडले होते....... सर्वांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न की मिताली इथे कुठून आली..... इथे तर तनुजा हवी होती...... मिताली सुन्न होऊन फक्त उभी होती...... चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते...... डोळे सारखे वाहतच होते...... मितालीचे बाबा तिच्या कडे आले..... ती मान खाली घालूनच उभी होती......" मिताली, तू इथे कशी काय.....?? नवरीच्या वेषात तू काय करतेस इथे....?? " थोडासा रागीट आणि पाणवलेला त्यांचा आवाज ऐकून तिला अजूनच भरून आलं...... काहिच कळतं नव्हत..... ती शांतच उभी होती...... नजर खाली खिळलेली...... तनुजा थोडी समोर येते...... बाहेरच काहीतरी गोंधळ ऐकू येत होता म्हणून मितलीची आई पण लग्न मंडपात येते...... मितालीला नवरीच्या जागी बघून त्यांना आश्चर्य