शालिनीचं काय चुकलं ? भाग २ भाग १ वरुन पुढे वाचा शालिनी मॅडमनी सर्व वृत्तान्त कथन केला. अगदी जसं घडलं होतं तसा. नंतर पोलिसांनी प्रिन्सिपल आणि इतरांची चौकशी केली आणि ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी शाळेला सुट्टी देण्यात आली आणि सगळा स्टाफ आणि शिक्षक लोक अन्त्यसंस्कारात सामील झाले. पोलिसांनी ‘आत्महत्या’ म्हणून केस ची नोंद केली. अश्या प्रकारची घटना शाळेत प्रथमच घडत होती, त्यामुळे सर्वांवरच शोक कळा पसरली होती. अत्यंत व्यथित अंत:करणाने निलेशच्या आई, वडिलांचे सांत्वन करून सगळे आपापल्या घरी गेले. त्याच मोहल्यात एका गल्लीत वेगळंच नाटक चालू होतं. एका मोहल्ला नेत्याच्या घरी बैठक भरली होती. एक जण नेताजीला सल्ला देत