सफर विजयनगर साम्राज्याची... - भाग ६

  • 5.5k
  • 2.2k

सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी हेमकूट टेकडी हे हम्पीमधील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे; आणि जवळच्या मातंगा टेकडीच्या तुलनेत माथ्यावर पोहोचणे तितकेसे अवघड नाही..या टेकडीवर साधारण तीस पस्तीस मंदिरांचा समूह आहे.. त्यातील काही विजयनगर साम्राज्य अस्तित्वात येण्या अगोदर बांधलेली असावीत.संपूर्ण टेकडीला दगडी तटबंदी आहे.. दोन मार्गाने इथे प्रवेश करता येतो.. दक्षिण बाजूला असलेल्या मुख्य प्रवेशद्वारातून किंवा बाजारपेठेत जे भगवान विरूपक्षाचे मंदिर आहे त्याच्या डाव्या बाजूने..आम्ही मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केला. टेकडीवर जाण्याअगोदर समोरचं ससिवेकलू गणेशाची आठ फुटी सुंदर मूर्ती दगडी मंडपात विराजमान झालेली पाहायला मिळते.या मूर्ती बाबतही एक कथा सांगितली जाते ती अशी एकदा खूप जास्त जेवण जेवल्याने गणेशाचे पोट इतकं फुगल की