पाहिले न मी तुला - 3

  • 6.6k
  • 3.1k

७ रायगड प्रदक्षिणा १ फेब्रुवारी चा दिवस उजाडला. आज पहिलं काम जाहीर होणार होतं. सगळे गट वेळेवर एलसीडी च्या समोर हजर झाले. रिंगटोन वाजली आणि समोर मेसेज आला.. पहिले टास्क 'रायगड प्रदक्षिणा' दिनांक १९ फेब्रुवारी. सगळ्यांनी एकमेकांकडे भुवया वर करून बघितलं. कारण दर वर्षी एखाद्या जवळपासच्या गावात स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड असे सोपे उपक्रम असायचे .पण या वेळेस जरा वेगळंच होतं. मुलांची परीक्षा जवळ आल्याने मध्ये काही दिवसांचा गॅप ठेवला होता. जो गट प्रदक्षिणा सर्वात आधी पूर्ण करेल तो गट पहिल्या फेरीचा विजेता होणार होता. पहाटे चार वाजता रायगड प्रदक्षिणेला सुरुवात होणार होती. शिवाय १९ फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती किल्ले रायगडावर