आरोपी - प्रकरण १५

  • 8k
  • 3.9k

प्रकरण १५ न्यायाधीश मंगरूळकर आपल्या बाकावर स्थानापन्न झाले.अत्यंत न्यायप्रिय, विचारी आणि वस्तुनिष्ठ असा त्यांचा लौकिक होता. आपल्या अंगाभोवती चा झगा त्यांनी सारखा केला आणि समोर बसलेल्या सगळ्या लोकांकडे आणि वकिलांकडे एक दृष्टिक्षेप टाकून ते म्हणाले, “महाराष्ट्र राज्य विरुद्ध क्षिती अलूरकर असा हा खटला आहे. तिच्या वर आरोप आहे की खुनाच्या उद्देशाने हातात हत्यार घेऊन हल्ला करणे. दोन्ही बाजूंचे वकील तयार आहेत?” हेरंभ खांडेकर, सरकारी वकील उठून उभे राहिले. “ इफ द कोर्ट प्लीज, आम्ही सरकार पक्ष तयार आहोत. मला एवढेच प्रतिपादन करायचं आहे की एका तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध हा खटला दाखल करण्यात आलेला आहे. हा प्राथमिक खटला आहे आणि त्याचा