निर्धार.... लढूनी जिंकण्याचा - भाग 2

  • 8.4k
  • 1
  • 3.7k

सलोनी भरभर चालत होती. आज तिला खूपच उशीर झाला होता. किर्र अंधार पडला होता. मनात विचारांचे वादळ उठले होते. का कोणास ठाऊक पण आज तिच मन खूपच अस्थिर झाल होत. काहितरी अघटीत घडणार आहे अस राहून राहून वाटत होत. का अस होत नेहमी मुलींनी काय कोणाच वाईट केलेल असत कि त्यांना त्यांची स्वप्न गुंडाळावी लागतात. दुसरे जे सांगतील ते ऐकावेच लागते. स्वतः हाच्या मनाच थोडही ऐकायला मिळत नाही आणि वर अशी राहा तशी राहा हि सुनावणी. एकिकडून अस विचारांच चक्र चालू होत तर दुसरीकडून काहितरी अघटीत घडणार अशी चाहूल लागत होती. ............ दोस्ती आईला समजवत होती. ये आई बास ग