रात्र खेळीते खेळ - भाग 16

  • 7.3k
  • 3.2k

अधिराजला काहीच सुचेना झालेल कि काय करायच ते त्याच्यासोबत कावेरीच रूप घेऊन ती स्त्रीच चाललेली होती. ती ने त्याला भिती दाखवली नसली किंवा जरी चांगल वागण्याच नाटक करत असली तरी तीला दूर करण गरजेच होत कारण त्याशिवाय त्याला त्याच्या मित्रांपर्यंत पोहोचणच शक्य होणार नव्हत. आणि जरी तिच्यासोबत तो मित्रांपर्यंत पोहोचला तरी त्याच्या मित्रांसमोर आणखी एक अडचण उभी झाली असती अस त्याला वाटत होत. त्याला त्याच्या मित्रांना अडचणीत आणायच नव्हत. त्याला मनोमन अस वाटत होत आपण इथून बाहेर पडू अगर न पडू पण आपले मित्र सुखरूप बाहेर पोहोचले पाहिजेत. याच विचारातून त्याने एक निर्णय घेतला कि या स्त्रीला आपण आपल्या मित्रांपर्यंत