मिशन :फौजी वाईफ️ - भाग 1

  • 7.6k
  • 1
  • 3.2k

सगळ्यांच्या मनात अगदी अचानक स्मशान शांतता पसरली होती.पुढे काय होतय?एवढेच विचार मनात येत होते.समोर आत्ता जरी 'सगळं व्यवस्थित सुरू आहे' असं वाटत असलं तरी देखील ते तस नक्कीच नव्हतं.हे सगळ्यांना ठाऊक होतं. "हॉटेल ब्लु डायमंड देहली (दिल्ली).." "सेव्हन स्टार हॉटेल..सर्व सोयीसुविधायुक्त अस आणि आत्ता या रात्रीच्या रंगीबेरंगी झगमगाटात लखाखत असणार हॉटेल ब्लु डायमंड..." हॉटेल ब्लु डायमंड....!दिल्ली मधील एक प्रसिद्ध सेव्हन;स्टार हॉटेल...!अगदी चकचकीत,झगमगीत...!अनेक लाईट्स,लायटिंग माळा,बल्स,कलरफुल छोट्या ट्युबस....अशा अनेक प्रकारच्या प्रकाशित साधनांनी ते हॉटेल झगमगत होत....!आत्ता च्या या रात्रीच्या दिखाव्याला तर ते आजूनच शोभा देत होत...! आत्ता सेव्हन स्टार हॉटेल म्हणलं म्हणजे?नक्कीच तिथे गडगंज श्रीमंत असणारे लोक येणार?त्यांचीच उठबस तिथे असणार...!हो नक्कीच...!