अंकिलेश - एक प्रेमकथा - 35

  • 3.5k
  • 1.6k

३५ @ अंकिता इट वाॅज टफ. स्टेइंग अवे फ्राॅम अख्खि. पण नंतर तो आलाच. आय वाॅज सो हॅपी. मला माहिती होतं तो येणारच. खरं तर तो काय बोलणार ते ही ठाऊक होतं. त्याला हे व्हिटिलिगोचं कारण पुरेसं नाही हे ही माहिती होतं. सिनेमात अशा वेळी हीरो किंवा हिराॅइन दुसऱ्याच्या मनातून उतरण्यासाठी काहीबाही ट्रिक्स करतात. मग जो दुसरा किंवा दुसरी असेल तो किंवा ती दु:खभरे गाणं वगैरे गातात. पण ना हा सिनेमा होता, ना मी हिराॅइन होते.. फक्त अख्खि माझा हीरो होता! तेव्हा असं सारं माझ्याकडून तर होणार नव्हतं. पण अखिलेश समोर आला नि माझा तो निश्चय लगेच बर्फासारखा वितळून वाहून